महिला आरक्षणः जदयुतील मतभेद संपले

Posted on Monday, March 08, 2010 by maaybhumi desk


नवी दिल्‍ली

महिला आरक्षण विधेयका संदर्भात मतभेद असलेल्‍या जनता दल युनायटेडमध्‍ये अखेर एकमत होण्‍याचे संकेत मिळू लागले असून त्‍यामुळे हा पक्ष विधेयकास पाठिंबा देण्‍याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाचे अध्‍यक्ष शरद यादव यांनी विधेयकास विरोध दर्शविला असला तरीही बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्‍यासह पक्षातील काही नेते विधेयकाच्‍या बाजूने असल्‍याने अखेर पाठिंबा देण्‍याबाबत एकमत होण्‍याची शक्यता आहे.


विधेयकाच्‍या पाठिंब्या संदर्भात विचार करण्‍यासाठी सोमवारी पक्षाच्‍या संसदीय समितीची बैठक बोलावण्‍यात आली असून त्‍यात या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राज्यसभेत जदयुच्‍या सात खासदारांमध्‍ये जॉर्ज फर्नाडीस प्रकृती अस्‍वाथ्‍यामुळे अनुपस्थित असणार आहेत. तर उर्वरित सहा नितीश यांच्‍या जवळचे समजले जातात. त्‍यामुळे ते विधेयकास पाठिंबा देण्‍याची शक्यता आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "महिला आरक्षणः जदयुतील मतभेद संपले"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner