विंदांचे साहित्य व त्‍यांना मिळालेले पुरस्‍कार

Posted on Sunday, March 14, 2010 by maaybhumi desk

vdkarandikar काव्यसंग्रह
* स्वेदगंगा (इ.स. १९४९)
* मृद्गंध (इ.स. १९५४)
* धृपद (इ.स. १९५९)
* जातक (इ.स. १९६८)
* विरूपिका (इ.स. १९८१)
* अष्टदर्शने (इ.स. २००३) (या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार)


संकलित काव्यसंग्रह

* संहिता (इ.स. १९७५) (संपादन - मंगेश पाडगावकर)
* आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन - विजया राजाध्यक्ष)


बालकविता संग्रह

* राणीची बाग (इ.स. १९६१)
* एकदा काय झाले (इ.स. १९६१)
* सशाचे कान (इ.स. १९६३)
* एटू लोकांचा देश (इ.स. १९६३)
* परी ग परी (इ.स. १९६५)
* अजबखाना (इ.स. १९७४)
* सर्कसवाला (इ.स. १९७५)
* पिशीमावशी आणि तिची भुतावळ (इ.स. १९८१)
* अडम् तडम् (इ.स. १९८५)
* टॉप (इ.स. १९९३)
* सात एके सात (इ.स. १९९३)
* बागुलबोवा (इ.स. १९९३)


ललित निबंध

* स्पर्शाची पालवी (इ.स. १९५८)
* आकाशाचा अर्थ (इ.स. १९६५)
* करंदीकरांचे समग्र लघुनिबंध (इ.स. १९९६)


समीक्षा

* परंपरा आणि नवता (इ.स. १९६७)
* उद्गार (इ.स. १९९६)


अनुवाद

* ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (इ.स. १९५७)
* फाउस्ट (भाग १) (इ.स. १९६५)
* राजा लिअर (इ.स. १९७४)


अर्वाचीनीकरण

* संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर (इ.स. १९८१)


इंग्रजी समीक्षा

* लिटरेचर ऍज अ व्हायटल आर्ट (इ.स. १९९१)
* अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (इ.स. १९९७)



विंदाना मिळालेले पुरस्कार

विंदांना अनेक सन्मान आणि पुरस्कारांनी गौरविण्यात आले. परंतु, ८ जानेवारी २००६ रोजी त्यांना २००३ या वर्षासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार सर्वोच्च होता. मराठी साहित्यात वि.स.खांडेकर, कुसुमाग्रज यांच्यानंतर विंदांच्या रूपाने तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

* ज्ञानपीठ पुरस्कार
आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी हा पुरस्कार ८ जानेवारी २००६ रोजी जाहीर झाला . पुरस्काराचे वृत्त समजताच, "पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नाही, तर मराठी भाषा, कविता आणि काव्य पंरपरेचा हा सन्मान आहे. आज मी फक्त त्याचे केंद्र झालो आहे", अशा शब्दांत विंदांनी भावना व्यक्त केल्या.
* कबीर सन्मान
* जनस्थान पुरस्कार
* कोणार्क सन्मान
* केशवसूत पुरस्कार
* विद्यापीठांच्या डी.लिटस्


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "विंदांचे साहित्य व त्‍यांना मिळालेले पुरस्‍कार"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner