राज्यमंत्र्यांनी घातली कार्यकर्त्याला लाथ
औरंगाबाद
पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याच्या आरोपाने चीडलेल्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणूक बैठकी दरम्यानच आपल्या पक्षाच्या एका कार्यकत्याच्या छातीवर लाथ मारली असून यामुळे संबंधित कार्यकर्ता बेशुद्ध पडला आहे. अब्दुल सत्तार हे सिल्लोड मतदार संघातून निवडून आले आहेत.
औरंगाबाद शहरात पुढील महिन्यात महानगर पालिका निवडणूक होणार आहे. या संदर्भात येथे कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि प्रगती आघाडीत एक बैठक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकी दरम्यानच कार्यकर्त्यांनी राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप लावला. यामुळे चीडलेल्या सत्तार यांनी कॉंग्रेस कार्यकर्ता निसार मुश्ताक यांच्या छातीवर लाथ मारली.
यामुळे मुश्ताक बेशुद्ध पडले असून त्यानंतर निर्माण झालेल्या वादाबद्दल आता सत्तार यांनी बचावात्मक पवित्रा घेतला असून आपण निसार मुश्ताक यांना ओळखत नसून ते पक्ष कार्यकर्ताही नसल्याचे म्हटले आहे. नासिर यांनी याबाबत आपल्यावर दबाव टाकला जात असून या विषयावर अधिक चर्चा न करण्यास सांगितले जात असले तरीही आपण शांत बसणार नसून याबाबत पोलिसांवर तक्रार दाखल करणार असल्याची तक्रार केली आहे.
No Response to "राज्यमंत्र्यांनी घातली कार्यकर्त्याला लाथ"
Post a Comment