भगत सिंह शहीदी दिवसाचा पाकमध्‍येही कार्यक्रम

Posted on Monday, March 22, 2010 by maaybhumi desk

लाहोर


शहीद भगत सिंह यांच्‍याबद्दल केवळ भारतातच नव्‍हे तर पाकिस्तानी नागरिकांमध्‍येही आदराची भावना असून पाकमधील सारस्‍वतांमध्‍ये त्यांच्‍याबद्दल कमालीचा आदर आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या शहीद दिनानिमित्त लाहोरच्‍या शादमान चौकात 23 मार्च रोजी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.


पाकिस्तानच्‍या ‘इंस्टिट्यूट ऑफ पीस एंड सेक्‍युलरिज्म’च्‍या कार्यकर्त्‍या दीप सईदा यांनी भगत सिंह यांना फाशी देण्‍यात आलेल्‍या लाहोर शहरातील शादमान चौकात मोठ्या कार्यक्रमचे आयोजन केले आहे.


भारताशिवाय पाकमध्‍येही तेथील बुद्धीवादी लेखकांमध्‍ये भगत सिंह यांच्‍याबद्दल भरपूर आदर आहे. कराची येथील प्रसिध्‍द लेखिका जाहिदा हिना यांनी आपल्‍या एका लेखात भगत सिंह हे पाकिस्‍तानातील सर्वांत महान शहीद असल्‍याचे म्हटले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "भगत सिंह शहीदी दिवसाचा पाकमध्‍येही कार्यक्रम"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner