'माया'हाराच्‍या सीबीआय चौकशीची गरज नाहीः न्‍यायालय

Posted on Monday, March 22, 2010 by maaybhumi desk

लखनऊ


उत्तर प्रदेशच्‍या मुख्यमंत्री मायावती यांना बसपाच्‍या रॅलीत घालण्‍यात आलेल्‍या कोट्यवधी रुपयांच्‍या हारा संदर्भात सीबीआय चौकशी करण्‍याची याचिका अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने फेटाळून लावली आहे. अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाच्‍या लखनऊ खंडपीठाने ही याचिका रद्द बातल ठरविताना घटनेची चौकशी सीबीआयकडून करण्‍याची गरज नसल्‍याचा निर्वाळा दिला आहे.

पक्षाच्‍या स्थापना दिनानिमित्त मायावती यांना कोट्यवधी रुपयांच्‍या नोटांचा हार घालण्‍यात आला होता. या घटनेनंतर देशभर नाराजी व्‍यक्त झाली असून कॉंग्रेसने हा हार पाच कोटी रुपयांचा असल्‍याचा आरोप केला आहे. तर बसपा नेत्‍यांनी सुरूवातीला नकार देताना अखेर माळा हजार रुपयांच्‍या नोटांपासून बनविल्‍याचे मान्‍य केले.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'माया'हाराच्‍या सीबीआय चौकशीची गरज नाहीः न्‍यायालय"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner