थँक गॉड दिल्लीत कुणीही 'ठाकरे' नाही!

Posted on Monday, March 22, 2010 by maaybhumi desk


नवी दिल्ली

देशाची राजधानी असलेल्‍या दिल्‍लीत देशभरातील कुठल्‍याही राज्यातून लोक येऊन राहू शकतात. इथे सर्व जण सुरक्षित आहेत. कारण दिल्‍लीत कुठलाही 'ठाकरे' नाही, अशा शब्‍दात दिल्लीच्‍या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍यावर शरसंधान साधले आहे.


महाराष्ट्रात सुरू असलेल्‍या मराठी व अमराठी वादासंदर्भात दीक्षित म्हणाल्‍या, की दिल्ली एक सार्वलौकिक महानगर असून येथे केरळ, जम्मू व काश्मीर किंवा ईशान्‍येकडूनही अनेक लोक येऊन वास्‍तव्‍य करीत आहेत. त्‍यांना सर्वांना दिल्‍लीत पुरशी सुरक्षितता दिली जाते आणि मुंबईत सुरू असलेला भेदभाव दिल्‍लीत केला जात नाही. कारण दिल्‍लीत महाराष्ट्रासारखा कुणीही 'बाळासाहेब ठाकरे' नाही. याबाबत आपण ईश्‍वराचे आभार मानतो. 



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "थँक गॉड दिल्लीत कुणीही 'ठाकरे' नाही!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner