'विहीर'चा भव्य प्रीमियर

Posted on Sunday, March 21, 2010 by maaybhumi desk


अमिताभ बच्चन कार्पोरेशन लिमिटेडद्वारा निर्मित पहिला मराठी चित्रपट विहीर महाराष्ट्रात सगळीकडे प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. गुरुवारी रात्री अमिताभ बच्चन यांनी या पहिल्या मराठी चित्रपटाचा भव्य प्रीमियर जुहू येथील पीव्हीआर चित्रपटगृहात आयोजित केला होता. चित्रपटाचे प्रदर्शन पीव्हीआर मल्टीप्लेक्सतर्फे करण्यात आले आहे.


प्रीमियरच्या अगोदर पत्रकारांशी बोलताना अमिताभ बच्चन यांनी सांगितले, की प्रादेशिक भाषांमध्ये नेहमीच चांगले चित्रपट बनतात. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक उत्कृष्ट चित्रपट तयार झालेले आहेत. उन्मेष कुलकर्णी या चित्रपटाची कथा घेऊन आमच्याकडे आला तेव्हा जयाला ही कथा खूपच आवडली आणि लगेचच तिने चित्रपट निर्मिती करण्याचे मान्य केले. कोणत्याही अडथळ्याविना आम्ही हा चित्रपट तयार केला आहे. अनेक फिल्म फेस्टीवलमध्ये या चित्रपटाचे चांगले स्वागत झाले आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.


चित्रपटाच्या प्रीमियरला दिग्दर्शक उमेश कुलकर्णीसह विहीर चित्रपटाची पूर्ण टीम उपस्थित होती. अमिताभ बच्चन, जया बच्चन स्वतः सगळ्या आमंत्रितांचे स्वागत करीत होते. चित्रपटाने फिल्म फेस्टीवलमध्ये नाव केले असले तरी मुंबईच्या प्रेक्षकांनी चित्रपटाला म्हणावा तेवढा प्रतिसाद दिलेला नाही.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




1 Response to "'विहीर'चा भव्य प्रीमियर"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner