टीसीने ट्रेनमधून फेकल्‍याने प्रवाशाचा मृत्यू

Posted on Sunday, March 21, 2010 by maaybhumi desk

बडोदा
प्रवाशासोबत तिकिटावरून झालेल्‍या वादानंतर बडोदा-मुंबई ट्रेनच्‍या टीसीने एक प्रवाशाला चालत्‍या ट्रेनमधून फेकल्‍याची घटना शनिवारी घडली. यात प्रवाशाचा मृत्यू झाला असून यामुळे चीडलेल्‍या प्रवाशांनी टीसीला बेदम मारहाण केली आहे.

अरविंद डी. निनामा (25, दाहोद) या प्रवाशाकडे तिकीट नसल्‍याने तिकीट तपासनीस बी.आर. शर्मा यांच्‍याशी त्‍यांचे वाद झाले. यामुळे चिडलेल्‍या टीसीने प्रवाशाला ट्रेनमधून धक्के मारून बाहेर काढण्‍याचा प्रयत्न केला यात प्रवाशी चालत्‍या ट्रेन बाहेर फेकला गेला. त्‍यात निमामा हा गंभीर जखमी झाला असून त्याचा बडोदा येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 



यामुळे चीडलेल्‍या प्रवाशांनी चेनपुलिंग करून ट्रेन मकरपूरा स्टेशन जवळ थांबविली आणि टी.सी. शर्मा यांना बेदम मारहाण केली. तसेच मकरपूरा स्टेशन मास्टरच्‍या कार्यालयातही जोरदार तोडफोड केली.

यानंतर एसआरपी-जीआरपीने घडनास्‍थळी पोचून स्थितीवर नियंत्रण आणले. गंभीर जखमी अवस्‍थेत टीसी शर्मा यांना रेल्‍वे हॉस्पीटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे. तर गंभीर अवस्‍थेत प्रवाशाला बडोदा येथील रुग्णालयात दाखल करण्‍यात आले तेथे त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "टीसीने ट्रेनमधून फेकल्‍याने प्रवाशाचा मृत्यू"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner