विमानात सापडला गावठी बॉम्ब
Posted on Sunday, March 21, 2010 by maaybhumi desk
तिरूवनंतपुरमवरून बंगळुरूला जात असलेल्या किंगफिशरच्या एका विमानात रविवारच्या सकाळी गावठी बॉम्ब आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा जागृत झाल्या असून याबाबत शोध घेतला जात आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार किंगफिशरच्या आयटी-4731 या विमानाच्या कार्गोमध्ये चेंडूच्या आकाराचा बॉम्ब आढळून आला आहे. हे विमान तिरुवनंतपुरम विमानतळावर उतरविण्यात आले असून सर्व प्रवाशांना उतरवून त्यांची तपासणी केली जात आहे.
हे विमान आज सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास तिरूवनंतपुरम येथून बंगळुरूकडे जात होते. विमानाने उड्डाण
घेतले मात्र त्याचवेळी एका प्रवाशाने कॅप्टनला संशयास्पद वस्तू दिसल्याची माहिती दिल्यानंतर विमान तत्काळ तिरूवनंतपुरम विमानतळावर उतरविण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "विमानात सापडला गावठी बॉम्ब"
Post a Comment