पुणे आणि कोच्ची आयपीएलचे सर्वांत महागडे संघ
Posted on Sunday, March 21, 2010 by maaybhumi desk
आयपीएलच्या आठ संघांमध्ये पुणे आणि कोच्चीच्या दोन नवीन संघांचा समावेश झाला असून सहारा एडव्हेंचर्स स्पोर्ट्सने पुणे तर रेनडेव्यू स्पोर्ट्स लिमिटेडने कोच्ची संघ खरेदी केला आहे. या दोनही संघाचा 2011 मध्ये होणा-या चवथ्या आयपीएलमध्ये समावेश केला जाईल.
आयपीएल सामन्यांचा लाईव्ह स्कोर तुमच्या कम्प्युटरवर
संघासाठी सर्वाधिक बोली सहाराने लावली असून सहाराने हा संघ 379 मिलियन डॉलरला खरेदी केला. सहाराने अहमदाबाद, नागपूर आणि पुण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. मात्र त्यातील पुण्याची निवड केली. तर दुसरी मोठी बोली रेनडेव्यू स्पोर्ट्सने लावली या कंपनीने 333.33 मिलियन डॉलरला कोच्ची संघ खरेदी केला आहे.
संघांची संपूर्ण मालकी मिळविण्यासाठी या संघांना 48 तासांच्या आत या बोलीपैकी दहा टक्के रक्कम जमा करावी लागेल.
परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर हे आयपीएलमध्ये समावेश केलेल्या कोच्ची संघात रेनडेव्यू स्पोर्ट्सचे भागिदार असल्याचे वृत्त सध्या माध्यमांमध्ये आहे. मात्र थरूर यांनी त्यास नकार दिला आहे.
लेबले:
breaking news,
cricket,
current news,
india,
indian news,
IPL,
IPLcricketnews/ iplscore,
sports,
top news,
आयपीएल

Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "पुणे आणि कोच्ची आयपीएलचे सर्वांत महागडे संघ"
Post a Comment