पुणे बॉम्बस्फोटाचे खापर बेकरी कर्मचार्यांवर
Posted on Sunday, March 14, 2010 by maaybhumi desk
पुणे
पुणे बॉम्बस्फोट होऊन महिना उलटला तरी तपासात काहीही प्रगती झालेली नाही. उलट आयुक्त सत्यपालसिंह यांनी मात्र या स्फोटांचे खापर जर्मन बेकरीतील कर्मचारी आणि तिथे आलेल्या ग्राहकांवर फोडले आहे. बॉम्ब असलेली पिशवी तेथे नव्वद मिनिटे पडून होती, असा दावा त्यांनी केला.
काही मिनिटे अथवा दहा-पंधरा मिनिटे अगदी तास अर्धा तास ती पिशवी पडून असती तरी काही हरकत नाही. पण नव्वद मिनिटे म्हणजे तिथे असलेल्या लोकांच्या निष्काळजीपणाची हद्द आहे, अशा शब्दांत सत्यपालसिंह यांनी या स्फोटातील मृत नि जखमींनाच दोषी ठरवले.
येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. ही पिशवी तिथे पडून आहे, हे तेथील कॅशियरच्याही काही ग्राहकांनी लक्षात आणून दिले होते. पण तो स्वतःच्याच कामात एवढा मग्न होता, की त्याला तिकडे लक्ष द्यावे वा पोलिसांना माहिती द्यावी एवढेही कळले नाही. त्यानंतर अवघ्या वीस मिनिटात हा बॉम्ब फुटला. जर्मन बेकरीतील कर्मचार्यांनी थोडी जरी काळजी घेतली असती तरी हा स्फोट नक्कीच टळला असता नि निरपराधांचे जीव गेले
नसते, असे आयुक्त म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पालुपद या घटनेचा तपास करणार्या एटिएसचे प्रमुख के. एस. रघुवंशी यांनी लावले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "पुणे बॉम्बस्फोटाचे खापर बेकरी कर्मचार्यांवर"
Post a Comment