दिलीप प्रभावळकरांना गद्रे पुरस्कार
Posted on Sunday, March 14, 2010 by maaybhumi desk
मुंबई
मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी तसेच छोटया पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे दिग्गज अभिनेता व लेखक दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा सु.ल. गद्रे कलाकार पुरस्कार' जाहीर झाला आहे. रविवारी १४ मार्च रोजी प्रभावळकर यांना नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या हस्ते मुलुंड येथील संस्थेच्या गद्रे सभागृहात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी प्रभावळकरांच्या मुलाखतीचाही कार्यक्रम होणार आहे. मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "दिलीप प्रभावळकरांना गद्रे पुरस्कार"
Post a Comment