भंगार तोफगोळ्याचा स्‍फोट, तीन मुले ठार

Posted on Wednesday, March 10, 2010 by maaybhumi desk

शिमला

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्‍ह्यात सैन्‍य दलाच्‍या फायरिंग रेंजजवळ झालेल्‍या तोफगोळ्यांच्‍या स्फोटात तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. ही मुले वापरल्‍या गेलेल्‍या गोळ्यातून पितळ काढण्‍याचा प्रयत्न करीत होते.

पोलीस उपाधीक्षक जीत सिंह यांनी दिलेल्‍या माहितीनुसार सैन्‍याच्‍या फायरिंग रेंजजवळ मंगळवारी उपयोग केल्‍या गेलेल्‍या गोळ्यातून पितळ काढण्‍याचा प्रयत्न केला गेला होता. 10 ते 12 वर्षाच्‍या तीन मुलांचा या स्‍फोटात मृत्यू झाला आहे.


या मुलांनी फायरिंग रेंज परिसरातून गोळे एकत्र करून त्यांना फोडून त्‍यातून भंगार सामान काढण्‍याचा प्रयत्न केला असता त्यांचा स्फोट झाला. त्यात तीन मुले घटनास्‍थळीच मारले गेले. 

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "भंगार तोफगोळ्याचा स्‍फोट, तीन मुले ठार"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner