'गोंधळी' खासदारांचे निलंबन रद्द होणार
Posted on Wednesday, March 10, 2010 by maaybhumi desk
भाजप आणि डाव्या पक्षांनी राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या सातही खासदारांचे निलंबन रद्द करण्याची मागणी सत्ताधारी पक्षाकडे केली असून त्या संदर्भात राज्यसभेत प्रस्तावही सादर करण्याची तयारी चालविली आहे. शक्य तितक्या लवकर हे करण्यासाठी दोन्ही पक्षांनी तयारी केली आहे.
गोंधळ घालणा-या सात खासदारांचे निलंबन
विधेयका संदर्भातील सर्व बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक सादर केले जात असताना जोरदार गोंधळ घालून विधेयकाचे कागद फाडून सभापतींच्या अंगावर भिरकावणे आणि सभापतींचा माईक उखडण्याचा प्रयत्न करत त्यांच्याशी हुज्जत घातल्या प्रकरणी समाजवादी पार्टीच्या चार आणि राजद, जदयू व लोजपाच्या 1-1 खासदारांना सभागृहाने मंगळवार अधिवेशन काळासाठी निलंबित केले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "'गोंधळी' खासदारांचे निलंबन रद्द होणार"
Post a Comment