महिला आरक्षणासाठी १६ मार्च 'डेडलाईन'
Posted on Wednesday, March 10, 2010 by maaybhumi desk
महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारने १६ मार्चची कालमर्यादा ठेवली आहे. कारण त्यानंतर तीन आठवड्यांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात येणार आहे. तत्पूर्वीच, हा विषय मार्गी लावण्याचा सरकारचा 'अजेंडा' आहे.
संसदीय व्यवहार मंत्री पी. के. बन्सल यांनी तसे संकेत दिले आहेत. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर
लोकसभेत ते मंजूर करण्याचे सरकारपुढे आव्हान आहे. राज्यसभेत झालेला गोंधळ पहाता, लोकसभेत त्यापेक्षा जास्त विरोध होऊ शकतो.
कदाचित सरकारचे अस्तित्वही पणाला लागू शकते. पण तरीही हे विधेयक मंजूर करण्यावर सरकार ठाम आहे. सरकारला सर्व घटकपक्ष तसेच भाजप व डावे पक्ष यांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास कायदामंत्री वीरप्पा मोईली यांनी व्यक्त केला आहे.
संसद १६ मार्चला स्थगित झाल्यानंतर पुन्हा १२ एप्रिलला भरेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "महिला आरक्षणासाठी १६ मार्च 'डेडलाईन'"
Post a Comment