पेशावरमधील हल्ल्यामागे तालिबान

Posted on Monday, April 05, 2010 by maaybhumi desk

मिरानशाह

पेशावरमधील अमेरिकन वकिलातीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील तालिबानने स्वीकारली आहे. अमेरिका करत असेलल्या ड्रोन हल्ल्यांचा सूड म्हणून हे हल्ले करण्यात आल्याचे कारण देऊन, अमेरिकी लोकांवर यापुढेही असेच हल्ले करण्यात येतील, अशी धमकीही दिली आहे.

तेहरीक ए तालिबानचा प्रवक्ता अझाम तारीक याने अज्ञात ठिकाणाहून दूरध्वनी करून ही जबाबदारी घेतली आहे. मी आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे आमच्याकडे २८०० ते ३००० फियादीन (आत्मघाती हल्लेखोर) आहेत. त्यांच्या सहाय्याने आम्ही यापुढेही जास्तीत जास्त हल्ले करत राहू. अमेरिकी लोक जेथे असतील ते ठिकाण आम्ही लक्ष्य करू, अशा शब्दांत तारीक याने तालिबानचे इरादे स्पष्ट केले आहेत.

तालिबान्यांनी आज पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांताची राजधानी आज बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी हादरवून टाकली. त्यात अमेरिकेची वकिलात आणि एक सभा हे त्यांचे लक्ष्य होते. या हल्ल्यात आतापर्यंत ४३ जण मरण पावल्याची माहिती हाती लागली आहे. पाकिस्तानात या वर्षी घडविण्यात आलेला हा सर्वांत भयंकर हल्ला आहे. हल्लेखोरांची ताकद इतकी वाढली आहे, की त्यांनी सहजपणे अमेरिकी वकिलात आणि इतर लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. त्यात पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचाही समावेश आहे.

आज तब्बल पंधरा अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेली दोन वाहने अत्यंत कडेकोट बंदोबस्त असलेल्या अमेरिकी वकिलातीपर्यंत नेऊन हिंसाचार घडविला. अर्थात, त्यांना या वकिलातीला थेट लक्ष्य करता आले नाही. एका आत्मघाती हल्लखोराने वकिलातीच्या दरवाज्याजवळच स्वतःला उडवून दिले. पोलिसांनी तातडीने त्याला प्रत्त्युत्तर म्हणून गोळीबार सुरू केला. त्यानंतर तीन स्फोटांनी हा परिसर हादरला. वकिलातीपासून वीस मीटर अंतरावर असलेल्या तपासणी नाक्याजवळ हे स्फोट घडविण्यात आले.

तत्पूर्वी सकाळी आत्मघाती हल्लेखोरांनी दीर जिल्ह्यात एका सभेत स्फोट घडवून आणला. त्यात त्यात ४१ जण मरण पावले. तर ८२ जण जखमी झाले. अवानी नॅशनल पार्टीच्या सभेवेळी व्यासपीठाजवळच हा स्फोट घडविण्यात आला. वायव्य सरहद्द प्रांताचे नामकरण खैबर-पखतुनवा असे झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ नियोजित कार्यक्रम काय करायचा हे ठरविण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.
 

Taliban claims responsibility for Peshawar blasts

PESHAWAR

Six people, including four attackers, were killed when heavily armed militants in two vehicles tried to storm the US consulate in Peshawar on Monday, a Pakistani minister said.

In a statement by the US Consulate General in Peshawar, the United States condemned the attack. According to the release, two Pakistani security guards employed by the Consulate General were among those killed in the attack.

Tehreek-e-Taliban Pakistan claimed responsibility for the attacks.

“We accept the attacks on the American consulate. This is revenge for drone attacks,” Tehreek-e-Taliban Pakistan spokesman Azam Tariq told AFP by telephone from an undisclosed location.

“We have already told you that we have 2,800 to 3,000 fedayeen (suicide bombers). We will carry out more such attacks. We will target any place where there are Americans,” he said.

“They came in two vehicles. The militants were well-equipped. It was a well-organised attack,” Bashir Ahmed Bilour, senior minister in the North West Frontier Province government headquartered in the city, told reporters.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner