छत्तीसगढमध्ये नक्षली हल्ल्यात 75 जवान शहीद
Posted on Tuesday, April 06, 2010 by maaybhumi desk
छत्तीसगडच्या दंतेवाडा भागात नक्षलवाद्यांनी केंद्रीय रिजर्व पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) टेहळणी पथकावर केलेल्या हल्ल्यात सुमारे 75 पेक्षा जास्त जवान शहीद झाले असून अनेक जण जखमी व बेपत्ता आहेत. हल्ल्याच्या घटनेनंतर त्वरित या जवानांच्या मदतीसाठी आलेल्या इतर जवानांमध्ये आणि नक्षलवाद्यांमध्ये जंगलात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा नक्षलवादी हल्ला समजला जात असून या कारवाईत 1000 पेक्षा जास्त
नक्षलवादी सहभागी असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार दंतेवाडा जिल्ह्यातील चिंतलनार भागातील मुकरानाच्या दाट जंगलातून गस्तीवरून परतत असलेल्या सीआरपीएफच्या 120 जवानांच्या वाहनांना भू-सुरूंग स्फोट घडवून नक्षवाद्यांनी उडवून दिले यानंतर सुमारे 1000 नक्षलवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात सुमारे 75 जवान शहीद झाले असल्याचा प्राथमिक अंदाज गृहमंत्रालयाने वर्तविला असला तरीही स्फोटात जखमी झालेल्या जवानांवर नक्षलींनी अंधाधुंद गोळीबार सुरू केल्याने कुणाचीही वाचण्याची शक्यता खूप कमी आहे.

नक्षलवाद्यांविरोधात सरकारने ऑपरेशन ग्रीन हंट सुरू केले असून त्याचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. आजवरचा हा सर्वांत मोठा नक्षलवादी हल्ला समजला जात असून जंगलात चार ते पाच ठिकाणी दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू आहे. नक्षलींनी जवानांच्या मदतीला गेलेल्या हेलिकॉप्टरवरही जोरदार गोळीबार केल्याने हेलिकॉप्टर उतरविण्यास अडचणी येत आहेत.
गृहमंत्रालयाकडून निषेध
केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून आतापर्यंत 73 जवान शहीद झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. जंगलात अनेक जवान बेपत्ता असून त्यांचा संपर्क खंडित झाल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता गृहमंत्रालयाने वर्तविली आहे. महाराष्ट्र, प.बंगाल, आंध्र प्रदेश, झारखंड आणि बिहारमधील नक्षल प्रभावित भागात हायअलर्ट जारी करण्यात आले आहेत.
ओरीसातील कोरपूट जिल्ह्यात भू-सुरूंग स्फोटात 11 जवान ठार झाल्याच्या घटनेच्या दुस-याच दिवशी हा हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणा खळबळून जाग्या झाल्या असून छत्तीसगड सरकारने आपात्कालीन बैठक बोलावली आहे.
काय घडले - कसे घडले
ऑपरेशन ग्रीन हंट अंतर्गत मुकरानाच्या दाट जंगलातून परतत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 120 जवानांची तीन वाहने नक्षलवाद्यांनी भू-सुरूंग स्फोट घडवून उडवून दिली. या पथकात असलेली एंटी माईन्स व्हेईकलही नक्षलींनी उडवून दिल्यानंतर जंगलात लपून बसलेल्या सुमारे 300 पेक्षा जास्त नक्षलींनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. यावेळी जवानांच्या मदतीला चार दिशेने आलेल्या उर्वरित पथकांवरही नक्षलींनी गोळीबार सुरू केला आहे. जंगलात सुमारे 1000 नक्षलवादी या कारवाईत सहभागी आहेत. सैन्य दलाच्या गोळीबारात आतापर्यंत 21 नक्षलवादी मारले गेले असून त्यांचे मृतदेह त्यांच्या साथीदारांनी त्वरित जंगलात सुरक्षित ठिकाणी नेले आहेत.
सरकारने नक्षलवादाच्या नायनाटासाठी 'ऑपरेशन ग्रीन हंट' ही मोहीम सुरू केली असून त्याचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी जंगलाच्या दिशेने येणा-या वाहनांच्या मार्गावर सुरूंग पेरून ठेवले आहेत.

70 security men killed by Naxals in Chhattisgarh
RAIPUR
A patrol party of the Central Reserve Police Force (CRPF) was on its way back from a three-day operation when it found itself totally ambushed.
From a hilltop in Chhattisgarh's Dantewada district, about 300 Naxals opened fire at the CRPF group of 73 men. Police officials confirm 70 of those men have died.
"We have rushed helicopters to evacuate the casualties," Chhattisgarh Director General of Police Viswa Ranjan told PTI. The incident took place in dense forest and the search and relief operations are being hampered.

The attack took place at 6 am on Tuesday morning. The Naxals blew up a car being used by the CRPF. They then fired at the patrol party from all directions. This patrol party had been camping in the interiors of Tarmetla jungles looking for Naxal camps.
The CRPF jawans were taken aback, but fired back.
The police confirms that by 11.30 am, the encounter had ended, and that its personnel were looking for dead bodies.
Dantewada has long been home turf for Naxals in Chattisgarh. The dense forest area is full of landmines.
The Naxal attack is seen as retaliation against the government's Operation Greenhunt- launched in Orissa and Chhattisgarh to clear Naxals.
Today's attack comes two days after Maoists triggered a landmine blast killing 11 security personnel and injuring several others in Orissa's Koraput district.
What happened:
A company of the Central Reserve Police Force (CRPF) with at least a hundred men was returning on Tuesday morning from a combing operation in the Chhattisgarh jungles.
The jawans were ambushed by 300 Naxals positioned on hill tops and hidden behind trees in the area's thick forests.
Landmines were blasted to stop the CRPF's vehicles; then the Naxals opened fire.
The CRPF jawans were taken by surprise, but fired back.
Helicopters are being rushed to the area to bring out injured jawans.
Dense jungles are hampering relief operations.
