'पाककडून भारतावर अणू हल्ल्याची शक्यता'
वॉशिंग्टन
भारतासोबत युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा दोन्ही देशातील तणाव वाढल्यास पाकिस्तान आपल्या जवळील अण्वस्त्रे भाडोत्री तालिबानी दहशतवाद्यांकरवी भारताविरोधात वापरू शकतो, अशी शक्यता अण्वस्त्रे प्रसार नियंत्रण आणि दहशतवाद विरोधी आयोगाचे प्रमुख बॉब ग्राहम यांनी व्यक्त केली आहे.
बॉब ग्राहम यांनी अमेरीकन खासदारांच्या एका समितीला सांगितले, की काश्मीरमुद्यावरून भारत आणि पाकमधील तणाव अधिक वाढल्यास पाकिस्तानकडून अण्वस्त्रे वापरण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या सुरक्षेबाबत अमेरीकेने यापूर्वीही चिंता व्यक्त केली असून या संदर्भात अभ्यास करीत असलेल्या एका संसदीय समितीला ग्राहम माहिती देत होते.
अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी भारत आणि पकिस्तान यांच्या संयुक्त सहयोगाने सुरक्षा प्रक्रिया असण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. मात्र ही योजना अमेरिका आणि सोवियत रशियासारखी नसावी असेही अधोरेखित करण्यात आले आहे.
No Response to "'पाककडून भारतावर अणू हल्ल्याची शक्यता'"
Post a Comment