मायावतींचा पुतळा सर्वांत कुरूप पुतळ्यांच्या यादीत
Posted on Thursday, August 04, 2011 by maaybhumi desk
नवी दिल्ली
उत्तर प्रदेशात चौकाचौकात आपले पुतळे स्थापन करण्याचा सपाटा लावलेल्या मुख्यमंत्री मायावती यांच्या पुतळ्याचा जगातील सर्वांत कुरूप पुतळ्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. एका आंतरराष्ट्रीय मासिकाने केलेल्या सर्व्हेक्षणानंतर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
अमेरिकेतून प्रकाशित होत असलेल्या ‘फॉरेन पॉलिसी’ या नियतकालिकात जगातील सर्वांत कुरूप पुतळ्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यात मायावती यांचा पुतळा सहाव्या क्रमांकावर आहे. ज्या पुतळ्याचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यात मायावती यांच्या एका बाजूला बसपाचे संस्थापक कांशीराम आणि मागे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत.
जगातील 'सर्वांत कुरूप पुतळे' या नावाच्या प्रसिद्ध झालेल्या या यादीचे 'जेव्हा निकृष्ट कला आणि दर्जाहीन राजकारण एकत्र येते’ असे उपशीर्षक आहे.
लेबले:
breaking news,
current news,
hot news,
india,
indian news,
latest news,
national news,
news,
top news
