विमान अपघातः 13 वर्षांत 6000 मृत्यू
Posted on Saturday, May 22, 2010 by maaybhumi desk
अमेरीकेने 2007 मध्ये विमान अपघाता संदर्भातील प्रसारित केलेल्या एका आकडेवारीनुसार 346 विमान अपघातात 5147 जण मारले गेले आहेत. या अपघातात 286 प्रवाशी विमानांचा तर 70 कार्गो विमानांचे अपघातात आहेत. हा आकडा 1998 ते 2007 या दहा वर्षातील आहे.
2008 नंतर आतापर्यंत जगभरात सुमारे 40 मोठे विमान अपघात झाले असून त्यात सुमारे 1000 लोक मारले गेले आहेत. यात मंगळूरमध्ये नुकत्याच झालेल्या अपघाताचाही समावेश्ा आहे. तर काही दिवसांपूर्वी लीबिया आणि पोलंडमध्ये झालेल्या अपघातातील मृतांची संख्याही यात गृहीत धरली आहे.
