मंगळूरः विमान अपघातातात 163 जणांचा मृत्‍यू

Posted on Saturday, May 22, 2010 by maaybhumi desk

मंगळूर

दुबईहून मंगळूरकडे येत असलेले एअर इंडिया एक्‍सप्रेसचे बोईंग विमान धावपट्टीवर उतरत असताना घसरून शेजारच्‍या दरीत कोसळल्‍याने झालेल्या अपघातात विमानातील 163 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या विमानात 137 प्रौढ, 19 बालके व चार नवजात बालकांसह आणि चालक दलाचे सहा सदस्य होते.


याबाबत विमानतळ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान धावपट्टीवरून उतरताना घसरून धावपट्टीच्‍या पुढे कुंपण तोडून ते शेजारील दरीत कोसळले. त्यानंतर विमानाला लगेच आग लागली. ती विझवण्यासाठी तत्काळ अग्निशमन दलाचे 20 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अपघाताताच्‍या वेळी विमानात 177 प्रवाशी व चालकदलाचे सदस्‍य होते. त्‍यापैकी घटनास्‍थळीच 163 जणांचा मृत्यू झाला असून सात जणांना रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. मृतांमध्‍ये 19 मुलांचाही समावेश आहे.

एअर इंडियाने दिल्ली विमानतळावर मदतसेवा केंद्र सुरू केले असून त्याचे दूरध्वनी क्रमांक - 011-2565-
6196 आणि 011-2560-3101 असे आहेत.

अपघातानंतर त्वरित बचावपथक घटनास्‍थळी दाखल झाले असून मंगळूर विमानतळ काही काळासाठी बंद करण्‍यात आले आहे.

163 dead as Air India aircraft overshoots runway

Mangalore (PTI)

As many as 160 persons were feared dead when an Air India Express flight from Dubai with 173 on board crashed and caught fire today as it overshot the newly built runway while landing at the Mangalore airport.

"According to me 160 people are not alive. A few people have been shifted to hospital," Karnataka Chief Minister B S Yeddyurappa told reporters in Bangalore shortly after one of the worst air crashes in India.

According to preliminary information, there were 173 persons on board Flight IX-892, operated by a Boeing 737-800.

This included 163 passengers, four infants and six crew members on board. The crash occured around 6.30 AM.

Home Minister V S Acharya told reporters five to six people may have survived.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

breaking news
current news



मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner