माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांचे निधन

Posted on Saturday, May 15, 2010 by maaybhumi desk

जयपूर

श्‍वासोच्‍छवासाचा त्रास जाणूव लागल्‍याने रुग्णालयात दाखल करण्‍यात आलेले माजी उपराष्‍ट्रपती भैरवसिंह शेखावत यांचे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्‍या सुमारास निधन झाले असून त्‍यांची श्‍वसनयंत्रणा बंद पडली होती.

शेखावत यांच्‍यावर उपचार करणा-या डॉ. नरपतसिंह यांनी या बाबतची अधिकृत घोषणा केली असून शेखावत यांना उपचारासाठी शुक्रवारी दाखल करण्‍यात आले होते. शेखावत यांना येथील सवाई मानसिंह रुग्णालयात गेल्‍या 13 मे रोजी रात्री दाखल करण्‍यात आले असून त्‍यांच्‍या फुफ्फूस आणि छातीत संक्रमण झाले होते.

ते राजस्‍थानचे तीन वेळा मुख्‍यमंत्री होते. तर उपराष्‍ट्रपतीपदावरही त्यांची कारकीर्द उल्‍लेखनीय होती.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner