हैदराबादमध्‍ये सीमीचा हल्‍ला

Posted on Saturday, May 15, 2010 by maaybhumi desk

हैदराबाद

हैदराबाद शहरातील शाह अली बंडा या जुन्‍या भागातील एका पोलीस चौकीवर शुक्रवारी सायंकाळी तीन बंदुकधा-यांनी केलेल्‍या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. हा हल्‍ला सीमीच्‍या दहशतवाद्यांकडून झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले असून हल्‍लेखोरांपैकी एकाची ओळख पटवण्‍यात पोलिसांना यश आले आहे.

या गोळीबारात शहीद झालेला हवालदार यू. रमेश आंध्र प्रदेश स्पेशल पोलीस सेवेत कार्यरत होता. ज्या पोलीस दलावर हा हल्‍ला झाला तो मक्का मशिदीत 2007 मध्‍ये झालेल्‍या स्फोटाच्‍या तिस-या स्‍मृतिदिनाच्‍या निमित्ताने सुरक्षा बंदोबस्‍तात होता. हा दिवस 18 मे रोजी आहे. हल्‍ला झाला तो भाग मुस्‍लीम बहुल असून तो चारमीनारपासून केवळ एक किलोमीटर अंतरावर आहे.

हल्‍ल्‍यातील तिघा हल्‍लेखोरांपैकी एकाची ओळख पटली असून तो सीमीचा कार्यकर्ता वकार असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे.

हैदराबाद पोलिसांना एक महिन्‍यापूर्वीच आयबीने मुंबई सारख्‍या हल्‍ल्‍याची शक्यता वर्तवून सावध राहण्‍यास सांगितले आहे. तर मक्का स्‍फोटाच्‍या स्‍मृतिदिनी 18 मे रोजीही सतर्क राहण्‍यास सांगितले आहे. त्‍या पार्श्‍वभूमीवर स्पेशल पोलीस जवानांना तैनात करण्‍यात आले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner