नक्षलींविरोधात सैन्याची तयारी सुरू
रायपूर
नक्षलींचा गढ बनत चाललेल्या छत्तीसगढमध्ये सैन्य दलाचे सब एरिया मुख्यालय उघडण्यात आले असून सैन्याच्या मध्य कमांडने येथे ब्रिगेडियर कृष्णन ए. यांची नियुक्ती केली आहे. हे पाऊल नक्षलवाद्यांविरोधात एक मोठी संभाव्य कारवाई म्हणून पाहिली जात आहे.
नुकत्याच राज्याच्या दौ-यावर आलेल्या सैन्याच्या मध्यभारत एरियाचे जनरल ऑफीसर कमांडिंग (जीओसी) मेजर जनरल व्ही.के. धल्ल यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह पोलीस व प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धल्ल 28 किंवा 29 मे रोजी रायपूरमध्ये येण्याची शक्यता आहे.
तर सैन्याच्या मध्य कमांडचे जीओसी लेफ्ट. जनरल व्ही.के. अहलुवालियाही एक जूनला रायपूरमध्ये येणार आहेत. दिल्लीत झालेल्या सैन्य कमांडर्सच्या बैठकीत मध्य कमांडने नक्षलींविरोधात सैन्याच्या वापरावर प्रेजेंटेशन सादर केले होते.
रायपूरचा सब एरिया हेडक्वार्टर सैन्य तैनाती झाल्यानंतर लॉजिस्टिक सपोर्टसाठी मदत करणार आहे. कारवाईपूर्वी सैन्याने या भागातील अधिकाधिक भौगोलिक माहिती गोळा करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आसाममध्ये बोडो दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी तयार करण्यात आलेल्या आसाम रायफल्स किंवा राष्ट्रीय रायफल्ससारखी छत्तीसगड आणि ओरीसासाठीही वेगळी फोर्स बनविली जाण्याची शक्यता आहे.
मायभूमीचा टूलबार डाऊन लोड करण्यासाठी खाली किंवा इथे क्लिक करा
| toolbar powered by Conduit |