लेखणीस चालवत गेलो (गज़ल)

Posted on Saturday, May 22, 2010 by maaybhumi desk

लेखणीस माझ्या धार लावत गेलो
व्यवस्थेवर सपासप वार करत गेलो (१)

कलमास माझ्या नव्याने चालवत गेलो
ढोंगी राजकारण्यांना उघडे पाडत गेलो (२)

प्रस्थापितांना नवं आव्हान देत गेलो
विखारी सापांना पायदळी ठेचत गेलो (३)

नवविचारांचा आगाज करीत गेलो
धर्मांधांचे टराटरा बुरखे फाडत गेलो (४)

छाताडावर टीकांचे वार झेलत गेलो
शब्दांस माझ्या ढाल बनवितं गेलो (५)

झुंडशाहीला शब्दांनी नेहमी ठोकीत गेलो
(व्यक्ती) स्वातंत्र्यास जिवापाड जपत गेलो (६)
                                                    -सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner