नक्षलवाद व विमान अपघात नैतिक जबाबदारी माझीः पंतप्रधान
नवी दिल्ली
देशाचा पंतप्रधान या नात्याने मी संसदेला आणि लोकांना उत्तर देण्यास बांधील आहे. दंतेवाडातील नक्षलवादी हल्ला असो किंवा मंगळूरमध्ये झालेला विमान अपघात या सर्व घटनांना नैतिक दृष्ट्या मी जबाबदार आहे. देशासमोर यासारखी अनेक आव्हाने आहेत आणि ती सोडवण्यासाठी आम्हाला अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी राष्ट्रीय पातळीवरील पत्रपरिषदेत दिले.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुस-या कारकीर्दीस एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येथील विज्ञान भवनात देशभरातील पत्रकारांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेपूर्वी मंगरूळ येथे शनिवारी झालेल्या विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
डॉ. मनमोहन सिंह म्हणाले, की सरकारने एक वर्षाच्या काळात केलेल्या कामाने खरं तर मी स्वतः समाधानी नाही आम्ही यापेक्षा अधिक चांगलं काम करू शकलो असतो. मात्र येत्या चार वर्षांत यातील त्रुटी भरून काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जाईल. न्यायदान प्रक्रीयेत सुधारणा व पारदर्शकता आणणे, देशातील शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण, रोजगार आणि अन्न पोचवणे हे सरकारचे प्राधान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
यूपीए सरकारच्या दुस-या शासन काळात सरकारसमोर अनेक आव्हाने होती आणि पुढेही असतील. दहशतवादाचा धोका आणि कट्टररवादावर नियंत्रणासाठी सरकारने पुरेसे प्रयत्न केले आहेत. आपल्या समोर केवळ शेजारीच नाहीत घरातील दहशतवादही मोठे आव्हान असून ते पेलण्यात सरकार निश्चितच यशस्वी होत आहे. महागाईवरही डिसेंबर अखेरीपर्यंत नियंत्रण मिळवून विकासाचा दर 8.5 टक्क्यांवर आणण्यात आपण यशस्वी ठरू असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
देशांतर्गत आणि बाहेरील दहशतवाद आव्हान
पंतप्रधान म्हणाले, की देशांतर्गत काही फुटीर तत्वांकडून वाढविला जात असलेला दहशतवाद आणि देशाबाहेरील घटकांकडून वाढविला जात असलेला दहशतवाद हे सरकार समोरील मोठे आव्हान असले तरीही त्यावर नियंत्रणासाठी सरकार कटीबद्ध आहे. दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो असे सांगून तो संपवण्यासाठी आपले सुरक्षा दल सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारताला आपल्या सर्व शेजा-यांशी चांगले संबंध हवे असून भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या अविश्वासामुळे दोन्ही देशांमध्ये काही समस्या आहेत. मात्र त्या सोडवल्या जाऊ शकतात. दहशतवादाच्या मुद्यावर आम्ही पाकिस्तानशी सातत्याने चर्चा करीत असून दोन्ही देशांतील मतभेद व दुरावा कमी व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. पाकसोबत असलेल्या काश्मीर मुद्या संदर्भातील वादावरही दोन्ही देश सामंजस्याने आणि तथ्यांचा स्वीकार करून तोडगा काढतील असा आशावादही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
वर्षा अखेरीस मंदीतून पूर्ण सावरू
आर्थिक पातळीवर सरकार काही अंशी अपयशी ठरल्याचे मान्य करत पंतप्रधानांनी आम्ही यापेक्षा आणखी चांगले करू शकलो असतो हे कबुल केले. ते म्हणाले, की अर्थव्यवस्थे संदर्भात काही प्रश्नांमध्ये सत्यता नाकारता येणार नाही. मात्र आपली अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत अनेक पटींनी सक्षम आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर 2008 मध्ये आर्थक संकट आले. त्यावेळी जगभरातील अर्थव्यस्था उध्वस्त झाली. त्याचा परिणाम भारतावरही पडणे साहजिकच होते. मात्र तरीही आम्ही याची प्रत्यक्ष झळ बसू न देण्यात यशस्वी ठरलो. वर्ष 2008-09 मध्ये आर्थिक विकासाचा दर 6.7 टक्के होता. तो 2009-10 मध्ये वाढून 7.2 टक्के झाला. या वर्षा अखेरीस तो 8.5 टक्क्यावर आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
महागाईमुळे देशातील जनतेवर त्याचा भार पडतो ही समस्या गेल्या एक-दोन वर्षांपासून आहे. मात्र त्यास आंतरराष्ट्रीय मंदी आणि पेट्रोलियम पदार्थांच्या वाढलेल्या किंमती कारणीभूत आहेत. गेल्या वर्षी काही भागात कोरडा दुष्काळ, तर काही भागात महापूर यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. त्यामुळेही महागाई वाढली. मात्र येत्या डिसेंबरपर्यंत महागाईचा दर पाच ते सहा टक्क्यांवर आणण्यात यश येईल.
डॉ.मनमोहन सिंह यांच्या सलग सहा वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच इतका वेळी पत्रकार परिषद घेतल्याने यातून अनेक बाबींची उत्तरे समोर येणार आहेत.
New Delhi
In his first full-fledged press conference after UPA came to power for the second time, Prime Minister Manmohan Singh said that it is for the people of the country to decide on the performance of the UPA government.
“I could do better than what I have done, but I am reasonably satisfied with the pace with which we are working,” the PM said while accepting that inflation and Naxalism remained problem areas.
Prime Minister Manmohan Singh effused confidence that his government will complete its term but added that he did not want to do any ball-gazing for the next election.
“I have every reason to believe that we will complete our term. Although we are a coalition government, we have given our country a government which works, which has delivered high rates of growth, which has accelerated the process to inclusive growth,” he said.

Asked if there will be UPA-III, he said: "As to what happens after this term, we are, I think, too far away to say."
The PM also indicated that he is open to handing over the baton to the next generation, "Well, I sometimes feel that young people should take over (as Prime Minister)... I would be very happy to make place for anybody," he said.
On a pointed question about the suitability of Rahul Gandhi for the post of the Prime Minister, the PM said, “Rahul is very qualified to hold a cabinet post. I have discussed it with him on a number of occasions. He always gave me a positive answer but said that he has duties to perform in reviving the Congress party. He would a "very appropriate addition" to the cabinet as and when he is ready.”
On the issue of the perceived lack of accountability in his government, Manmohan Singh said that as Prime Minister of the country, he was accountable to the people and to Parliament.
"As Prime Minister of the country I am accountable to Parliament, to people at large," the PM said, two days after an air crash in Mangalore that led to union Civil Aviation Minister Praful Patel offering his resignation, and he declining to accept it.
"There are issues which have to be tackled, we have to go into the causes of these tragedies," the Prime Minister said. He added that this had to be done to ensure that "so far as humanly possible these accidents are not repeated again and again".
