पाक-अफगाणमध्ये अमेरीकेचे अनेक हेर सक्रीय
वॉशिंग्टन
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात अजुनही अमेरीकन हेरगिरी नेटवर्क सक्रीय असून अमेरीकेच्या या गुप्तहेरांनी अनेक गुप्त माहिती शोधून काढली आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच सरकारने काही सैन्य अधिकारी आणि माजी सीआयए अधिका-यांना या भागात पाठवल्याचा दावा केला होता. मात्र नंतर लगेच ते बंद केल्याचे सांगितले होते.
या संदर्भात अमेरीकेने असे कुठलेही नेटवर्क या देशांमध्ये नसल्याचा दावा केला असला तरीही आतापर्यंतच्या अनेक मुलाखतींतून या देशांमध्ये अशा प्रकारचे नेटवर्क सक्रीय असल्याचे आढळून आले आहे. लोक सातत्याने तालिबानच्या विरोधात गुप्त माहिती गोळा करून ही माहिती आपल्या टॉप कमांडर्सकडे सोपवित आहेत.
अमेरीकन सैन्याला पाकिस्तानात अशा प्रकारचे काम करण्यास बंदी असली आणि अमेरीकन संरक्षण मुख्यालय पेंटागॉनच्या नियमानुसार सैन्याला हेर ठेवण्यास मनाई असली तरीही हे सुरूच असल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला आहे.
![]()