हसवणुकीचा हाऊसफुल्‍ल

Posted on Wednesday, May 05, 2010 by maaybhumi desk

बॅनर : नाडियाडवाला ग्रेंडसन एंटरटेनमेंट, इरोज एंटरटेनमेंट
निर्माता : साजिद नाडियाडवाला
दिग्दर्शक : साजिद खान
संगीत : शंकर-अहसान-लॉय
कलाकार : अक्षय कुमार, लारा दत्ता, दीपिका पादुकोण, जिया खान, रितेश देशमुख, अर्जुन रामपाल, रणधीर कपूर, चंकी पांडे, बोमन इरानी, मलाइका अरोरा, लिलेट दुबे
रेटिंग : 2.5/5


साजिद खानचा 'हाऊसफूल' हा निव्वळ टाईमपास चित्रपट आहे. डोक्याला ताप न करून घेता पाहिला तर मस्तपैकी एन्‍जॉयही करू शकाल. 'हे बेबी' नंतर साजिद खानने हसवणूक करणारा दुसरा सिनेमा दिला आहे.

हाऊसफूलमध्ये काय नाही. गमतीजमती, खेचाखेची, टोप्या घालणे, त्यातून होणारे विनोद आणि जोडीला ताल धरायला लावणारे संगीत आणि दणदणीत परफॉर्मन्सेस.

आरूष (अक्षय कुमार) याला पनवती मानले जाते. कुठेही गेला तर याच्यामुळे दुसर्‍याचे कायम नुकसान होत असते. केवळ लग्न झाल्यानंतरच हे सारे बंद होईल म्हणून तो आपल्या प्रेयसीशी लग्न करतो. परंतु, त्यानंतर अनेक गमतीदार घटना घडत जातात. गोंधळाचे प्रसंग निर्माण होतात.

काही बाबतीत साजिदने 'तोच तो' फॉर्म्युला वापरला आहे. समलैंगिक संबंधांचा विनोदासाठी केलेला वापर आता नवीन राहिलेला नाही. व्हॅक्युम क्लिनरमध्ये पोपट सापडणे, घरात वाघ आणणे हे बालिश विनोद वाटतात. चित्रपटात अनेक त्रुटी आहेत. पण तरीही एकुणात मनोरंजनाकडे पाहिल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले चालते.

बोमन इराणीने गुजराती खडूस सासर्‍याची भूमिका छान निभावली आहे. डेझी इराणी आणि रणधीर कपूरही लक्षवेधी भूमिकांत आहेत. अक्षय कुमार, रितेश देशमुख, अर्जुन रामपाल दीपिका पदुकोण, लारा दत्ता आणि जिया खान हे सगळे धमाल करतात. त्यामुळे हा चित्रपट एकदा नक्कीच बघण्यासारखा आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner