देशांतर्गत भागात घुसले 140 दहशतवादी!
Posted on Wednesday, May 05, 2010 by maaybhumi desk
आठवड्यात तिस-यांदा सागरी घुसखोरी!
नवी दिल्ली
गुजरातच्या सागरी सीमेवरून काही संशयित दहशतवादी घुसल्याचे वृत्त असून या घटनेनंतर संपूर्ण देशभर हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. गृहमंत्रालयाने पश्चिमी सीमेकडून दहशतवादी घुसल्याचे वृत्त दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्यास असून नौसेनाने भारतीय सागरी सीमेवरील गस्त वाढविली आहे.
एका आठवड्यात दहशतवादी घुसखोरी झाल्याची ही तिसरी घटना आहे. या संदर्भात सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार देशात एक मोठी दहशतवादी घटना घडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून त्यासाठी 140 दहशतवादी देशांतर्गत भागात घुसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हे सर्वजण अलकायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत.
