टायगर वुड्सचे स्थान धोक्यात
Posted on Wednesday, May 05, 2010 by maaybhumi desk
जागतिक गोल्फ क्रमवारीत गेल्या पाच वर्षांपासून असलेल्या टाइगर वुड्सच्या एकाधिकारशाहीवर आता अनिश्चिततेचे वादळ घोंगावत असून अमेरीकन गोल्फपटू फिल मिकेलसन आगामी 6 ते 9 मे दरम्यान येथे होणार असलेल्या प्लेयर्स चँपियनशीपमध्ये वुड्सला मागे टाकून क्रमांक एकचे स्थान मिळवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या स्थानावर जाण्यासाठी मिकेलसनला ही स्पर्धा जिंकणे आवश्यक असणार असून जर तो ही स्पर्धा जिंकला आणि वुड्स आघाडीच्या पाचमध्येही स्थान मिळवू शकला नाही तर हे शक्य करता येणार आहे. विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर सलग पाच महिन्यांपासून गोल्फपासून दूर असलेला वुड्स गेल्या आठवड्यात झालेल्या क्वेल हॉलो चॅम्पियनशीपच्या कटमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला होता.
जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या मिकेलसनने गेल्या महिन्यात आपल्या कारकीर्दीतील तिसरा मास्टर्स पुरस्कार जिंकला असून क्वेल हॉलो टूर्नामेंटमध्ये तो दुस-या क्रमांकावर आहे.
