नुसते फुले वाहून इतिहास कळत नाही- बाळासाहेब

Posted on Saturday, May 01, 2010 by maaybhumi desk

मुंबई


'हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून महाराष्ट्र कळत नाही, त्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या या दालनात यावे लागेल असे सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.


मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क येथे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे दालन उभारले आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची त्यात महत्त्वाची भूमिका आहे. त्यांचे कौतुक करून बाळासाहेबांनी रेव्ह पार्टीत अडकलेल्या आजच्या पिढीला हा इतिहास कळला पाहिजे अशी गरज व्यक्त केली.


बाळासाहेब तब्बल दोन वर्षांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. शिवसेनेतर्फे आज सायंकाळी शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांच्या उपस्थितीत गर्जा महाराष्ट्र हा कार्यक्रम होणार आहे.


दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे 'अमराठी' राग आळवताना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या 'अमराठी' हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "नुसते फुले वाहून इतिहास कळत नाही- बाळासाहेब"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner