'सारेगमप'मध्ये सोमवारी महाराष्ट्र दिन विशेष

Posted on Sunday, May 02, 2010 by maaybhumi desk

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची पन्नास वर्षे सर्वत्र दणक्यात साजरी होत असताना झी मराठीवरील लोकप्रिय 'आयडिया सारेगमप' हा कार्यक्रमही राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या पारंपरिक गीतांचा खास नजराणा पेश करणार आहे. सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र दिनानिमित्तचा हा विशेष भाग सोमवार, दि.3 मे रोजी झी मराठीवर प्रक्षेपित होईल.



महाराष्ट्राच्या पांरपरिक संगीत पंरपरेतील अभंग, भारुड, वासुदेव, शाहिरी काव्य, पोवाडा, कोळीगीत, नाटयगीत, अंगाईगीत, ठसकेबाज लावणी अशा वैविध्यपूर्ण गीतप्रकारांचे समृध्द दालन आयडिया सारेगमप'च्या मंचावर महाराष्ट्र दिनानिमित्त पुन्हा एकदा उलगडून दाखवण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या या सांगितिक परंपरेचे विविध टप्पे सादर अत्यंत बहारदार रिंत्या सादर करण्यात आले आहेत. तरुणांचा लाडका मंगेश बोरगावकर याने सादर केलेला वासुदेव 'उजळून आलं आभाळ रामाच्या पारी', महाराष्ट्राचा लाडका 'माऊली' ज्ञानेश्वर मेश्राम याने स्वतः संगीतबध्द केलेला 'कांदा मुळा भाजी' हा संत सावतामाळी यांचा अभंग, अनिकेत सराफने 'या या शेजारणीनं' हे भारुड, सायली ओकने पेश केलेली 'नका तोडू पावनं जरा थांबा' ही लावणी, आनंदी जोशीने गायलेले मंगळागौर गीत, विजय गटलेवारचं 'ऐका सत्यनारायणाची कथा', संहिताच्या आवाजातील 'एकवीरा आई तू डोंगरावरी' हे जोशपूर्ण कोळीगीत, अपूर्वा गज्जलाच्या आवाजातील 'निंबोणीच्या झाडाखाली चंद्र झोपला गं बाई' ही हळूवार अंगाई, अनिरुध्द जोशीने पेश केलेले 'शूरा मी वंदिले' हे नाटयगीत राहूल सक्सेनाच्या आवाजातील 'सुंदरा मनामध्ये भरली' हे गीत अशा वैविध्यपूर्ण पांरपरिक महाराष्ट्र गीतांची बहार आयडिया सारेगमप'च्या मैफलीत अनुभवायला मिळणार आहे.


लोकशाहिर विठ्ठल उमप यांनी महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवासाठी खास लिहिलेला महाराष्ट्रावरचा पोवाडा सादर करुन या सदाबहार मैफलीला चार चॉंद लावले. लोकशाहिरांची ही विशेष भेट आयडिया सारेगमपच्या
श्रोत्यांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. ही रंगतदार मैफल येत्या सोमवारी रात्री साडे नऊ वाजता झी मराठीवर
रसिकांना अनुभवता येईल. 

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

current news
breaking news



No Response to "'सारेगमप'मध्ये सोमवारी महाराष्ट्र दिन विशेष"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner