कलमाडी आणि कंपनीला पदे सोडण्याचे फर्मान
नवी दिल्ली
राष्ट्रीय क्रिडा महासंघाच्या (एनएसएफ) महत्वाच्या पदांवर दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून ठाण मांडून बसलेल्या राजकारणी, नोकरशहा आणि उद्योगपतींनी सध्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्वरित पद सोडण्याच्या सूचना क्रिडा मंत्रालयाने दिल्या आहेत.
मंत्रालयाने 1975 च्या नियमांमध्ये दुरुस्ती केली असून त्यानुसार आता भारतीय ऑलंम्पिक महासंघाचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि विविध क्रिडा महासंघांच्या अध्यक्षांना सध्याच्या कार्यकाळ संपतात पद सोडावे लागणार आहे. तसेच पुन्हा नव्याने निवडणुका लढविता येणार नाहीत.
NSF
या महासंघांवर सर्वाधिक संख्या राजकारण्यांची असून त्यात विजय कुमार मल्होत्रा (धनुर्विद्या), सुखदेव सिंह ढींढसा (सायकलिंग), व्ही.के. वर्मा (बॅडमिंटन), कॅप्टन सतीश के. शर्मा (एअरो क्लब) आणि बी.एस. आदित्यान (व्हॉलीबॉल) यांचा समावेश आहे.
मंत्रालयाने स्पष्ट केले आहे, की त्यांनी संशोधित कार्यकाळ नियम पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तो 2001 मध्ये तत्कालीन क्रिडा मंत्री उमा भारती यांनी आयओएसह राष्ट्रीय क्रिडा महासंघांमध्ये व्यवसायिक नियोजन, पारदर्शी संचालन, उत्तरदायित्व, लोकशाही पद्धतीने निवडणुकांना चालना देण्यासाठी स्थगित करण्याचे आले होते.
इंदिरा गांधी सरकारने 1975 मध्ये हा नियम लागू केला होता. या नियमानुसार अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्षांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला होता. तसेच तो चार-चार वर्षांच्या सलग दोन कार्यकाळांपेक्षा अधिक नसावा असा आदेश होता.
नवीन नियमानुसार आयओएसह एनएसएफ अध्यक्षांचा एकूण कार्यकाळ ब्रेकसह किंवा त्या व्यतिरिक्तही 12 वर्षांपेक्षा अधिक असणार नाही. तर सचिव आणि कोषाध्यक्ष यांना चार-चार वर्षांच्या सलग दोन कार्यकाळापेक्षा अधिक संधी मिळणार नाही.
No Response to "कलमाडी आणि कंपनीला पदे सोडण्याचे फर्मान"
Post a Comment