भारताची सुपर 8 मध्‍ये धडक

Posted on Sunday, May 02, 2010 by maaybhumi desk



सेंट लूसिया

दक्षिण अफ्रीकेचा 14 धावांनी पराभव करत भारताने सुपर 8 मध्‍ये आपले स्‍थान पक्के केले असून 187 धावांच्‍या अवघड आव्‍हानाचा सामना करायला उतरलेला दक्षिण अफ्रीकेचा संघ निर्धारित षटकात 5 गडी गमावून 172 धावाच करू शकला. 101 धावांची धमाकेदार खेळी करणारा सुरेश रैना सामनावीर ठरला.


सुरेश रैनाच्‍या धमाकेदार 61 चेंडुत 101 धावांच्‍या आक्रमक खेळीच्‍या बळावर भारताला हा विजय साकारता आला आहे. नाणेफेक हरल्‍यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्‍या भारतीय संघाने निर्धारित षटकात 5 गडी गमावून 186 धावा केल्‍या. सुरेश रैना व्‍यतिरिक्त युवराज सिंहने 30 चेंडुत 37 धावा केल्‍या. दक्षिण अफ्रीकेकडून आर क्लाइनवेल्टने सर्वाधिक 2 गडी बाद केले. जॅक्‍स कॅलिस, डेल स्टाइन आणि एल्बी मोर्कल यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही आणि पहिल्‍याच षटकात मुरली विजय 0 वर बाद झाला. त्‍यानंतर गौतम गंभीरच्‍या प्रकृती अस्‍वास्‍थ्‍यामुळे संघात समावेश करण्‍यात आलेल्‍या दिनेश कार्तिकने सुरेश रैना सोबत 28 धावांची भागीदारी केली.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

cricket



मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner