आनंदला मिळाले सात कोटी रुपये

Posted on Thursday, May 13, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता ठरलेला विश्वनाथन आनंद याला विजेतेपदाचा पुरस्कार असलेले सात कोटी रुपये मिळाले आहेत. आनंदने चौथ्यांदा विजेतेपद मिळविले आहे.

आनंदने बुल्गारियाच्या वेसेलिन टोपालोव याचा पराभव करीत 12 लाख यूरो (जवळपास सात कोटी रुपये) मिळविले. टोपालोवला आठ लाख यूरो रक्कमेवर समाधान व्यक्त करावे लागले. या विजेतेपदामुळे आनंदला ईएलओ रेटिंग गुण मिळाले. यामुळे त्याचे रेटींग 2800 च्याही पुढे जाईल.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner