एआयसीएफकडून आनंदचे अभिनंदन
Posted on Thursday, May 13, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने (एआयसीएफ) विश्वनाथन आनंदने बुद्धीबळातील आपले जगज्जेतेपद कायम राखल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. या विजेतेपदाचा दावेदार आपणच असल्याचे त्याने सिद्ध करुन दाखविल्याचे महासंघाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी सांगितले.
श्रीनिवासन यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटले आहे, की वेसेलिन टोपालोवविरुद्ध विजेतेपद कायम ठेवून आनंदने मोठे यश मिळविले आहे. त्याच्या या विजेतेपदामुळे भारतीय क्रीडाप्रेमींना आनंद झाला आहे. कठीण परिस्थितीत त्याने हे विजेतेपद मिळविले आहे.