पाऊस दहा दिवस आधीच येणार!

Posted on Saturday, May 01, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली

यंदा मान्सूनचे आगमन 7 ते 10 दिवस आधीच होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून केरळमध्ये तो दहा दिवस आधीच सक्रीय होणार आहे.

'प्री मान्सून रेन पीक' या घडामोडीत बंगालच्या उपसागराचे तापमान मान्सूनच्या 40 दिवस आधी वाढण्यास
सुरुवात झाली असून त्‍यामुळे दक्षिणेत पावसास सुरूवात होण्‍याची चिन्‍हे निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या घडामोडीवरून बांधलेला मान्सूनचा अंदाज चुकलेला नाही. गेल्यावर्षीही 'प्री मान्सून रेन पीक' ही घडामोड एप्रिलमध्ये सुरू झाली होती, तेव्हाही केरळमध्ये पावसाचे आगमन लवकर झाले होते.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner