नागपूरमध्‍ये स्‍फोटकांचा साठा जप्‍त

Posted on Sunday, May 09, 2010 by maaybhumi desk

नागपूर

नागपूर रेल्वे स्टेशनवर रेल्‍वे पोलिसांनी राबविलेल्‍या तपासणी मोहीमे दरम्यान एका व्‍यक्तीकडे 70 डिटोनेटर्स आणि 81 जिलेटीनच्‍या कांड्या आढळून आल्‍या असून या प्रकरणी एका जणास अटक करण्‍यात आली आहे. नक्षलवादी कारवायांच्‍या पार्श्‍वभूमीवर ही तपासणी करण्‍यात आली.

या व्‍यक्तीने आपण ही स्‍फोटके विहीरीच्‍या कामासाठी नेत असल्‍याचा दावा केला असला तरीही या स्‍फोटकांचा खरा मालक विजय नायडू फरार झाला आहे. या प्रकरणी एकास रेल्वेतून स्फोटके वाहून नेण्याच्या आरोपाखाली अटक करण्‍यात आली आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "नागपूरमध्‍ये स्‍फोटकांचा साठा जप्‍त"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner