राष्‍ट्रवादीने नवी मुंबईचा गड राखला

Posted on Sunday, May 09, 2010 by maaybhumi desk

मुंबई

राष्ट्रवादीचा गड समजल्‍या जात असलेल्या नवी मुंबई महापालिकेतील महापौरपदाच्‍या लढतीत नाईक घराण्‍याने बाजी मारली असून राष्‍ट्रवादीचे सागर नाईक हे महापौरपदी विजयी झाले आहेत. शिवसेना आणि राष्‍ट्रवादीत या पदासाठी चुरस होती. तर कॉंग्रेसने तटस्‍थतेची भूमिका घेतली आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीत सागर यांच्या पारड्यात 57 तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे जगदीश गवते यांना 17 मते मिळाली. तर उपमहापौरपदासाठी भरत नखाते यांची निवड झाली. त्यांनाही 57 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या सतीश रमाणे यांनाही 17 मते मिळाली आहेत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "राष्‍ट्रवादीने नवी मुंबईचा गड राखला"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner