न्यूझीलँडचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय
Posted on Saturday, May 01, 2010 by maaybhumi desk
टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात न्यूजीलँडने श्रीलंकेचा दोन गडी राखून पराभव केला. शेवटच्या चेंडुपर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्या या सामन्यात किवी संघाने एक चेंडु शिल्लक असताना विजय मिळवला.
येथील प्रोव्हीडन्स स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विजयासाठी 136 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करीत असलेल्या न्यूजीलँडच्या संघाला ब्रँडन मॅक्लमच्या रूपात पहिला धक्का बसला. त्यावेळी संघाने आपले खातेही उघडले नव्हते.
मात्र नंतर जेसी राइडरने धमाकेदार 42 धावांची खेळी करून सामना रंगात आणला. मोठा भाऊ ब्रँडन मॅक्लम शून्यावर बाद झाल्यानंतर लहान भाऊ नाथन मॅक्लमने संघाच्या विजयाची धुरा वाहत शेवटच्या षटकात न्यूजीलँडला विजय मिळवून दिला. विजयासाठी किवींना शेवटच्या शटकात लसिथ मलिंगाच्या चेंडुवर दहा धावा काढायच्या होत्या. नाथन मॅक्लमने हे आव्हान लिलया पेलत 6 चेंडुत 16 धावा केल्या.
तत्पूर्वी, तगडया खेळाडुंचा समावेश असलेल्या श्रीलंकेने 20 षटकात सहा गडी गमावून 135 धावा केल्या. महेला
जयवर्धनेने 51 चेंडुत 81 धावांची धमाकेदार खेळी केली. नाथनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
वाचण्यासारखे आणखीही काहीः
breaking news
- Gaddafi killed as Libya's revolt claims hometown
- एक पिज्जा = 12000 लीटर पाणी
- मायावतींचा पुतळा सर्वांत कुरूप पुतळ्यांच्या यादीत
- England makes slow but steady progress
- इजिप्त क्रांतीचा विजय
- 'ज्ञानेश्वरी' घातपातः सीबीआय चौकशीचा आदेश
- ले.जन.नंदा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
- चक्रीवादळापासून बचावासाठी 472 कोटींची तरतुद
- गुजरातला चक्रीवादळाच्या तडाख्याची शक्यता
- कोलकाता महापालिकेवर ममता 'राज', डावे गडगडले
cricket
- England makes slow but steady progress
- या मातीत जन्मल्याचा मला अभिमान- सचिन
- कांगारूंचा पराभव, इंग्लंड टी-20 चॅम्पियन
- महिला T-20 वर्ल्ड कपवर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
- हस्सीच्या तडाख्याने पाकचा धुव्वा
- मोदींविरुद्ध पुरेसे पुरावे नाही
- वर्ल्डकप: भारतीय महिला उपांत्य फेरीत
- भारताची सुपर 8 मध्ये धडक
- वेस्टइंडीजची विजयी सुरूवात
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "न्यूझीलँडचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय"
Post a Comment