मोटरमन संपावर तोडग्याची चिन्हे
Posted on Tuesday, May 04, 2010 by maaybhumi desk
पगार वाढीच्या मागणीसाठी मुंबईतील लोकल ट्रेन मोटरमननी पुकारलेल्या संपाबाबत सरकारने कठोर कारवाईचा बडगा उगारला असून 20 जणांना निलंबित केले आहे. तर सुमारे 150 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दुपारी बारा वाजता मंत्रालयात तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी रेल्वे, पोलीस प्रशासन आणि परिवहन अधिका-यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
संपामुळे सामान्य मुंबईकरांचे होणारे हाल पाहता शिवसेनेच्या कामगार सेनेने आंदोलनातून माघार घेण्याचा निर्णय घेतला असून यामुळे काही मोटरमन कामावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मोटरमनच्या आंदोलनावर सायंकाळपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या संपाचा मुंबईकरांना मोठा फटका बसला असून सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर वरची लोकल सेवा ठप्प झाली आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रवासावर अवलंबून राहू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मोटरमनच्या उपोषण विरोधात सरकारने कठोर भूमिका घेत सुमारे 150 जणांना अटक केली आहे. तर सुमारे 20 जणांना निलंबित करण्यात आले आहे. तर लोकसभेतही या घटनेचे पडसाद उमटले. मंगळवारी केवळ 15 ते 20 टक्के लोकल सेवा सुरू होती. बुधवारपर्यंत सेवा सामान्य होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Subscribe to:
Post Comments (Atom)
1 Response to "मोटरमन संपावर तोडग्याची चिन्हे"
they should punnish
Post a Comment