आयफोन 4 कडून ग्राहकांची साफ निराशा
Posted on Saturday, July 24, 2010 by maaybhumi desk
30 लाख फोन परत घेण्याची मागणी
बॅटरी आणि सिग्नल यंत्रणा अगदीच ढिसाळ
बॅटरी आणि सिग्नल यंत्रणा अगदीच ढिसाळ
- विकास शिरपूरकर
पुणे येणार-येणार म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा लागून असलेल्या आणि संपूर्ण जग आपल्या मुठीत सामावू शकत असल्याचा दावा करणा-या एप्पलच्या अत्याधुनिक आयफोन 4 ने पदार्पणातच आपल्या तमाम चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले असून वारंवार खंडित होणारी सिग्नल यंत्रणा, एफएम रेडिओ सारख्या साध्या फिचरचा अभाव आणि लवकर डिस्चार्ज होणारी बॅटरी यामुळे एपलचा तो आजवरचा सर्वांत अपयशी फोन ठरला आहे.
पदार्पणातच 30 लाख आयफोन 4 विकणा-या या कंपनीकडे आता ग्राहकांनी हे फोन परत घेण्याची मागणी सुरू केली आहे. तर या अडचणी लवकरच दूर केल्या जातील असा दावा कंपनीने केला आहे.
अमेरीकेसह जगभरात आयफोन 4 ची आतुरतेने प्रतिक्षा केली जात होती. म्हणूनच एप्पलने 24 जून रोजी लॉंच केलेला हा फोन अल्पावधीतच सर्वात जास्त विकला गेलेले उत्पादन ठरला आहे. मात्र अत्याधुनिक फोन घेतल्याच्या आनंदावर काही दिवसातच विरजण पडले असून त्यात अडचणींची मोठी यादीच समोर येऊ लागली आहे. फोनच्या अगदी प्राथमिक फिचर्समध्येही गोंधळ असून वेब ब्राऊजर फ्लॅशला सपोर्ट करत नाही. आजकाल अगदी साध्या मोबाईलमध्ये असलेले एफएम रेडीओ, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट, स्टीरिओ स्पीकर, ब्लुटुथच्या माध्यमातून फाईल ट्रान्सफर आणि स्मार्ट डायलींग सुविधा यात नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आयफोन 4चा पाच मेगा पिक्सल आणि एलईडी क्षमता असलेला कॅमेरा हे त्याचे बलस्थान आहे. असे असले तरीही 720 रिजेल्युशन व्हीडिओ क्षमता असलेल्या या फोनमधून व्हीडिओ सरळ इंटरनेटवर अपलोड करता येऊ शकत नाहीत. यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे.
सुमारे 45 ते 48 हजार रुपये किंमतीच्या या फोनच्या खालच्या बाजूला असलेला एंटीना तो हाताळताना वारंवार सिग्नल सोडत असतो. त्यामुळे यात कॉलड्रॉपचे प्रमाणही अधिक आहे. कंपनीने यावर तोडगा म्हणून यापूर्वी एक कव्हर विक्रीस आणले असले तरी ते मोबाईल सोबत दिले जात नव्हते. आता या अडचणी समोर आल्यानंतर ते मोफत दिले जात आहे.
मोबाईल अतिशय लहान आणि हलका बनविण्याच्या नादात त्याच्या बॅटरी क्षमतेशीही खेळ झाला असून त्यातील सर्व तांत्रिक क्षमतांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास बॅटरी लवकर संपत असल्याचे आढळून आले आहे. बॅटरी वारंवार चार्ज करावी लागल्याने तिचे आयुष्यही कमी असल्याची बाब समोर आली आहे.
सध्या केवळ अमेरीकेतच लॉन्च करण्यात आलेल्या आणि दिवाळीपर्यंत भारतीय बाजारपेठेत येणार असलेल्या या मोबाईलबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. नेट जगतात ब्लॉग आणि सोशल नेटवर्कींग वेबसाईटवरून तो मोबाईल खरेदी न करण्याबाबत आवाहन केले जात आहे.
कंपनीच्या काही तज्ज्ञांनी फोनची एंटिना डिजायन चुकीची असल्याचे आणि त्यामुळे कॉलड्रॉपच्या समस्या वाढतील असे आधीच सांगितले होते. मात्र त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कंपनीने बाजारपेठेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर फोन विकले आहेत, की ते आता परत मागवणे परवडणारे नाही. त्यासाठी कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागणार असून आयफोन-4 मधील गोंधळ समोर आल्यानंतर एपलचे शेयर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. या गोंधळात कंपनीला आतापर्यंत 16 मिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे.
भारतीय बाजारात दिवाळीपर्यंत हा फोन एअरटेल या दूरसंचार क्षेत्रातील मोठ्या कंपनीकडून लॉन्च केला जाणार असून त्यास आता कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागले आहे.
वाचण्यासारखे आणखीही काहीः
current news
- Gaddafi killed as Libya's revolt claims hometown
- एक पिज्जा = 12000 लीटर पाणी
- मायावतींचा पुतळा सर्वांत कुरूप पुतळ्यांच्या यादीत
- शरद पवार नावाचं गारूड
- विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १० जूनला मतदान
- डॉ. मंदाकिनी आमटे 'वूमन ऑफ द ईयर'
- 'ज्ञानेश्वरी' घातपातः सीबीआय चौकशीचा आदेश
- शिवराज्याभिषेक सोहळयास केंद्राची मंजुरी
- ले.जन.नंदा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
Comment (1)

Sort by: Date Rating Last Activity
Loading comments...
Comments by IntenseDebate
Posting anonymously.

BD Matrimony · 204 weeks ago
Matrimony in Bangladesh