बरसात की रात!
Posted on Friday, July 02, 2010 by maaybhumi desk
जिंदगीभर नही भूलेगी वो...
आम्ही दोघेच
अंधाराच्या गाभाऱ्यात
भुरुभुरु पावसाची हलकीशी सर
ओलावलेल्या पानांची मंद सळसळ...
गारव्याची झोंबाझोंबी...
आनंदाची शिरशिरी
कोण बोलले, काय बोलले
याची तमा कोणाला
हळुवार आठवणींचे मोरपिस मनाला गोंजारून गेले
ती रात्र, ती जागा, ती ती
मनात कायमची घर करून गेली
तारुण्यातील अवखळ मजा,
मैत्रीतील चढाओढ,
सीमेवरील भयाणकाळ रात्री,
पहाडावरील जीवघेण्या चढाया,
सागराचे तांडव, हवाईसफरीतील अटीतटीचे क्षण,
कारुण्याची झालर, संसारातील तृप्तीचे हुंकार,
मातेच्या प्रेमाची पाठीवर थाप,
पित्याशी साधला गेलेला अभौतिक संपर्क,
थोरांचे आशीर्वाद, विद्वानांची संगत, अदभूत विषयाची सलगी
ते क्षण मागे सरून गेले.
पण आठवणींच्या कप्प्यात सरकवलेल्या कोऱ्या नोटेसारखे करकरीत ताजे राहिले...
पुन्हा कधी असे भेटू माहित नाही..
कदाचित नाहीच...
पण ही रात्र संपु नये असे वाटते...
तिने शब्द खरे केले...
पावसाची भुरभुर, गडद अंधार झाला की...
ती बरसात की रात येते...
आठवणींची सौगात लेकर...
जिंदगीभर न भूलने के लिए...
- विंग कमांडर शशिकांत ओक,
पुणे.
मो.क्र. ०९८८१९०१०४९.
पुणे.
मो.क्र. ०९८८१९०१०४९.