इजिप्त क्रांतीचा विजय
Posted on Saturday, February 12, 2011 by maaybhumi desk

- होस्नी मुबारक पायउतार
- सत्ता लष्कराकडे
- देशभर जल्लोष, विरोधी पक्ष समाधानी
- लवकरच निवडणुका : लष्कराची घोषणा
कैरो, दि. ११ : तब्बल तीन दशके इजिप्तला आपल्या पोलादी पकडीत ठेवणारे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक आज अखेर जनक्षोभापुढे नमले. सप्टेंबरपर्यंत सत्ता सोडणार नसल्याची प्रतिज्ञा करून २४ तास उलटत नाहीत, तोच त्यांना कैरो सोडून परागंदा व्हावे लागले. मुबारक यांनी राजीनामा देताना आपली सत्ता लष्कराकडे हस्तांतरीत केली आहे. उपराष्ट्राध्यक्ष उमर सुलेमान यांनी राष्ट्रीय वाहिनीवरून ही घोषणा करताच इजिप्तवासियांनी देशभर जल्लोष केला. इजिप्त क्रांतीला पहिले यश मिळाले असले तरी देशात लोकशाही प्रस्थापित होणार की पुन्हा एकदा लष्करी हुकूमशाहीच्या गर्तेत देश लोटला जाणार हे नजिकच्या काळात स्पष्ट होऊ शकेल.
मुबारक यांनी गुरूवारी रात्री सत्ता सोडण्यास पुन्हा नकार दिल्याने व लष्कर त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी थेट त्यांच्या इत्तहादिया प्रासादाकडे मोर्चा वळविला होता. त्यामुळे मुबारक राजधानीतून पसार झाले असून ङङ्गशर्म अल शेख' या शहरातील एका सी रिसॉर्टमध्ये निघून गेले. तेथूनच त्यांनी सत्तेची सूत्रे लष्कराकडे सुपूर्द केल्याची घोषणा नवनियुक्त उपाध्यक्ष उमर सुलेमान यांनी राष्ट्रीय वाहिनीवरून केली. त्यानंतर देशभर एकच जल्लोष झाला. कैरोमध्ये वाहनचालकांनी गाड्यांचे हॉर्न वाजवून आपला आनंद साजरा केला. आंदोलकांचे नेतृत्व करणारे मोहम्मद अल बरदेई यांनी आपल्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रीया दिली आहे. मुस्लिम ब्रदरहुड या प्रतिबंधित पक्षाने देशात लवकरात लवकर लोकशाही स्थापन केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सप्टेंबरातील निवडणुका होईपर्यंत आपण अध्यक्षपदी कायम राहणार असल्याची घोषणा मुबारक यांनी गुरूवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली होती. त्यानंतर लगोलग आधी जनतेच्या बाजूने असलेल्या लष्करानेही मुबारक यांची पाठराखण केल्याने आंदोलक चिडले. मुबारक यांचे टीव्हीवरील भाषण सुरू असतानाच आंदोलकांनी बूट दाखवून आपला निषेध नोंदविला. तहरीर चौकात गेले १८ दिवस ठाण मांडून बसलेल्या निदर्शकांनी प्रासादाच्या दिशेने आगेकुच सुरू केल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली. आंदोलकांनी सरकारी वाहिनीच्या कार्यालयालाही वेढा दिला. कामगार, पत्रकार आणि धर्मगुरूही निदर्शकांना येऊन मिळाले असल्याने आंदोलनाचे बळ आणखी वाढले. वेगाने घडणार्या घटनांमुळे मुबारक यांनी एका लष्करी तळावरून शर्म अल शेखकडे पोबारा केला.
लोकशाही की लष्करी हुकूमशाही?
मुबारक यांनी सत्ता लष्कराकडे हस्तांतरीत केल्याने देशात एक हुकूमशहा पायउतार होताना पुन्हा लोकशाही कितपत नांदते याबाबत प्रश्नच आहे. लष्कराने आंदोलकांना मार्शल लॉ संपविण्याचे आश्वासन दिले असले तरीही ते आपल्या आश्वासनांवर कायम राहाते की देशाला नव्या हुकूमशाहीच्या गर्तेत लोटते हे येणारा काळ ठरवेल.
सत्ताधारी पक्षाध्यक्षांचा राजीनामा
ङङ्गइजिप्तला नव्या पक्षांची गरज आहे,' असे सांगत सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष होसाम बद्रावी यांनी आपले पद व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. इजिप्तमधील संघर्ष सुरू झाल्यानंतर बद्रावी यांची काही दिवसांपूर्वीच या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
वाचण्यासारखे आणखीही काहीः
breaking news
- Gaddafi killed as Libya's revolt claims hometown
- एक पिज्जा = 12000 लीटर पाणी
- मायावतींचा पुतळा सर्वांत कुरूप पुतळ्यांच्या यादीत
- England makes slow but steady progress
- 'ज्ञानेश्वरी' घातपातः सीबीआय चौकशीचा आदेश
- ले.जन.नंदा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
- चक्रीवादळापासून बचावासाठी 472 कोटींची तरतुद
- गुजरातला चक्रीवादळाच्या तडाख्याची शक्यता
- कोलकाता महापालिकेवर ममता 'राज', डावे गडगडले
Comment (1)

Sort by: Date Rating Last Activity
Loading comments...
Comments by IntenseDebate
Posting anonymously.

BD Matrimony · 204 weeks ago
Matrimony in Bangladesh