आंध्र प्रदेश: नाव बुडून 30 जणांना जलसमाधी

Posted on Saturday, January 30, 2010 by maaybhumi desk

हैदराबाद
आंध्र प्रदेशच्‍या गोदावरी जिल्‍ह्यातील एका गावात गोदावरी नदीत नाव उलटून झालेल्‍या अपघात
10 जण मरण पावले असून 20 जण बेपत्ता आहेत. सकाळी सहा वाजेच्‍या सुमारास हा अपघात घडला असून बचाव कार्य वेगाने सुरू आहे.
अपघातग्रस्‍त नावेत 30 लोक बसले होते. सर्वजण पौर्णिमेनिमित्त पूजेसाठी जात होते. आतापर्यंत नदीतून 10 मृतदेह बाहेर काढण्‍यात आले असून 20 जणांचा सुरू आहे.

या नावेत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसले होते असे प्रशासनाचे म्हणणे असून घटनेस पाच-सहा तास उलटूनही एकही प्रवासी जीवंत बाहेर येऊ न शकल्‍याने सर्वजण मृत झाल्‍याची शक्यता निर्माण झाली आहे.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "आंध्र प्रदेश: नाव बुडून 30 जणांना जलसमाधी"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner