पंतप्रधान निवासस्‍थानाजवळ गोळीबार

Posted on Saturday, January 30, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली
प्रजासत्ताक दिनानिमित्त तैनात करण्‍यात आलेल्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेला फोल ठरवत एक व्‍यक्ती पंतप्रधान
निवासस्‍थानापासून अवघ्‍या 200 मीटर अंतरावर एका हॉटेल समोर गोळीबार करून फरार झाली आहे. या संदर्भात होटल अशोकाच्‍या संचालकांनी चाणक्यपुरी पोलीस स्‍टेशनला तक्रार नोंदविल्‍यानंतर ही बाब उघडकीस आली आहे.
सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार ही घटना दि.28 जानेवारीची आहे. मारूती स्विफ्टमध्‍ये आलेल्‍या व्‍यक्तीने
हायसीक्योरिटी झोनमध्‍ये असलेल्‍या हॉटेल अशोकाच्‍या गेटजवळ अनेक राउंड गोळीबार केला. कडक सुरक्षा व्‍यवस्‍थेनंतरही ती व्यक्ती तेथून फरार झाली आहे.


 

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "पंतप्रधान निवासस्‍थानाजवळ गोळीबार"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner