पाकमध्ये पाच भारतीय मच्छिमारांना अटक
Posted on Saturday, January 30, 2010 by maaybhumi desk
इस्लामाबाद
पाकिस्तानच्या मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सीने (एमएसए) आपल्या देशातील सागरी सीमेत कथित रित्या मासेमारी करण्याच्या आरोपाखाली पाच भारतीय मच्छिमारांना त्यांच्या नावेसह अटक केली आहे. एमएसएने या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार भारतीय नौका आणि त्यातील पाचही मच्छिमारांना पाकच्या विशिष्ट आर्थिक क्षेत्रात अटक करण्यात आली आहे. पाचही जणांची चौकशी सुरू आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "पाकमध्ये पाच भारतीय मच्छिमारांना अटक"
Post a Comment