इथियोपियन विमान समुद्रात पडल्‍याने 92 बेपत्ता

Posted on Monday, January 25, 2010 by maaybhumi desk

बेरूत
लेबनानची राजधानी बेरूतमधून सोमवारी सकाळी उड्डाण घेतल्‍यानंतर काही वेळातच इथोपियाचे एक विमान भूमध्‍य समुद्रात पडले आहे. या विमानात 92 प्रवासी होते. अपघातातानंतर लगेच बचाव पथके रवाना झाली असून प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. अपघातात किती लोक बचावले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
इथेपियन एअर लाईन्‍सचे 409 विमान रात्री 2.30 वाजेच्‍या सुमारास (भारतीय वेळेनुसार रात्री 12.30 वाजता) ड्डाण घेतल्‍यानंतर अवघ्‍या पाचच मिनिटात अपघातग्रस्‍त झाले आहे. विमानात 83 प्रवाशी आणि नऊ चालक दलाचे सदस्‍य होते.

दक्षिणी बेरूतपासून सुमारे 15 किलोमीटर दक्षिणेकडील सादियात भागात घडलेल्‍या या अपघाताचे निश्चित कारण समजू शकले नसले तरीही दाट धुक्यामुळे तो झाला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. विमानात तिघे ब्रिटीश, कॅनडीयन आणि रशियन नागरीक होते तर अधिक संख्‍येने लेबनानी नागरीकांचा समावेश होता.  या अपघातासंदर्भात अद्याप विस्‍तृत माहिती समोर आलेली नाही.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "इथियोपियन विमान समुद्रात पडल्‍याने 92 बेपत्ता"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner