मुजीब यांच्या मारेकर्यांना ३५ वर्षांनंतर फाशी
Posted on Thursday, January 28, 2010 by maaybhumi desk
ढाका
बांगलादेशचे पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीब उर रहमान यांच्या हत्येप्रकरणी बांगलादेश सैन्याच्या पाच माजी सैन्य अधिकाऱ्यांना बुधवारी मध्यरात्री फाशी देण्यात आली. 1975 मध्ये या अधिकाऱ्यांनी शेख मुजीब उर रहमान यांच्या कुटुंबातील अनेकांची हत्या केली होती. तसेच बांगलादेशी सरकार उलथले होते. बुधवारी मध्यरात्री या साऱ्यांना फाशी देण्यात आली.
ढाक्यातील सर्वोच्च न्यायालयाने या पाच अधिकाऱ्यांची क्षमा याचिका रद्द केल्यानंतर देशातील 66 इतर तुरुंगातील सुरक्षा वाढवण्यात आली होती. न्यायालयाने या पाच अधिकाऱ्यांची फाशी कायम ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर या अधिकाऱ्यांना बुधवारी फाशी देण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "मुजीब यांच्या मारेकर्यांना ३५ वर्षांनंतर फाशी"
Post a Comment