कसोटी संघातून द्रविड, युवराज, श्रीसंत 'आऊट'
वृद्धिमान साहा, अभिमन्यू मिथून नवे चेहरे
नवी दिल्ली
बांगलादेशविरूद्ध झालेल्या दुसर्या कसोटीत जबड्याला चेंडू लागल्याने जखमी झालेल्या राहूल द्रविडचा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नागपूरमध्ये होणार्या कसोटीत समावेश करण्यात आलेला नाही. द्रविडसोबतच दुखापतग्रस्त युवराजसिंह आणि श्रीसंतही यांनाही वगळण्यात आले आहे.
निवड समितीने आज पहिल्या कसोटीसाठी पंधरा खेळाडूंचा संघ जाहिर केला आहे. त्यात पश्चिम बंगालचा विकेटकिपकर आणि मधल्या फळीतील फलंदाज वृद्धिमान साहा आणि कर्नाटकाचा वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथून या नव्या चेहर्याचा समावेश आहे. दिनेश कार्तिकलाही वगळण्यात आले आहे.
युवराज अंगठ्याच्या दुखापतीतून बरा होत आहे, तर श्रीशांतवरही त्याच्या पाठीवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना वगळण्यात आले आहे.
पहिल्या कसोटीसाठीचा संघ असा.
एम. एस. धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, एस. बद्रीनाथ, सचिन तेंडुलकर, व्हि.व्हि.एस.लक्ष्मण, हरभजनसिंग, झहिर खान, अमित मिश्रा, प्रज्ञान ओझा, इशांत शर्मा, एम.विजय, संदीप त्यागी, अभिमन्यू मिथून, वृद्धिमान सहा
No Response to "कसोटी संघातून द्रविड, युवराज, श्रीसंत 'आऊट'"
Post a Comment